कारंजात गारव्यात पाडवा पहाट

21 Mar 2026 18:31:03
स्थानिक गायकांना संधी
कारंजा (घा.), 
मराठी नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त 'Padwa pahat' पाडवा पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटेच्या मंगल वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून नववर्षाचे स्वागत केले. उन्हाळा कडक होत असला तरी पहाटेच्या सुमारास गारवा जाणवतो. त्या गारव्यात पाडावा पहाटही संगीत मैफल चांगलीच रंगत गेली. स्थानिक कलाकारांना पाडवा पहाटमध्ये संधी दिल्याचा प्रयोग जिल्ह्यात कारंजा येथील आयोजकांनी केला, हे उल्लेखनिय!
 
 
Padwa pahat
 
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गुढी पूजनाने झाली. स्थानिक गायक प्रफुल कामडी, दीपक ढोले, अतुल कुहीके व जानवी भस्मे यांनी सुरेल गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रंगतदार संचालन जया ठोंबरे व पवन ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक प्रेम महिले यांनी केले. विनोद ठोंबरे यांनी आभार मानले.
 
 
'Padwa pahat'  या प्रसंगी पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन, गट विकास अधिकारी प्रवीण देशमुख, माजी प्राचार्य व वृक्ष मित्र परिवाराचे संयोजक विलास वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पाडवा पहाट उत्सव समितीचे संयोजक प्रेम महिले, विनोद ठोंबरे व मारोती लोखंडे यांनी सहयोग राशी देणार्‍या दानदात्यांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0