शिरपूरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू ?

21 Mar 2026 20:00:22
आर्णी, 
आर्णी तालुक्यातील शिरपूर येथील युवा होतकरू, उमदा तरुण Akash Jadhav आकाश दुलसिंग जाधव (वय २६ ) यांचा शुक‘वार, २० मार्चला रात्री १० वाजता लोहारा जवळ यवतमाळ येथे भरधाव अनियंत्रित कारने जोरदार धडक दिल्याने झाला. आकाश हा गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर होता.
 
 
Akash
 
एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्याचा नावलौकिक होता. शंकरपट आयोजन, सांस्कृतिक कार्यक‘म, तसेच इतरांच्या सुखदुःखात तो नेहमीच धावून जायचा.या वर्षी त्याच्या लग्नाचीसुद्धा तयारी चालू होती. मित्र मंडळीत जीव की प्राण असणार्‍या त्याच्या असं‘य मित्र मंडळींना आकाशच्या अचानक जाण्याने प्रचंड मानसिक बसला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. गावात एकही चूल पेटली नाही.
 
 
Akash Jadhav आकाश सोबत घातपात तर झाला नाही ना, या चर्चेलाही गावात उधाण आले आहे. आकाशचा जीव घेणार्‍या निर्दयी कारचालकाला अटक करून योग्य कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा गावकर्‍यांतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पोलिस विभागाने योग्य कारवाई करून आरोपी कारचालकाला अटक करण्याची मागणी तमाम शिरपूरकरांनी केली आहे. एक होतकरू तरुण गमावल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0