'राजकारणात खळबळ' ठाकरेंचे गंभीर आरोप

21 Mar 2026 14:26:09
नाशिक,
Uddhav Thackeray नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. एका महिलेने अशोक खरातवर अत्याचार आणि बलात्काराचा आरोप केल्यावर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले असून, त्याचे राजकीय वर्तुळातले संबंध चर्चेचा विषय ठरत आहेत. अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
 

Uddhav Thackeray  
याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट विधान केले. उद्धव ठाकरे म्हणाले, “आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत? महाराष्ट्रात जादू टोणा विरोधी कायदा आहे आणि त्याचं पालन करणे आवश्यक आहे. कायद्याचं पालन करणाऱ्यांनाच भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भक्तांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. राजकारणात जे दिसत आहे, त्यावरच आधुनिक महाराष्ट्र ठरतो. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत, पण तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात, त्याला टाचण्या मारणं आमचं काम नाही.”
उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी पुढे सांगितले की, “या एपस्टिन फाईलच्या प्रकरणातून कुणाचंही लक्षण उडू नये. आपल्याकडे कायदा आहे, त्याचं कठोर पालन आवश्यक आहे. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावे या प्रकरणात येत आहेत. जे कर्तृत्वशून्य नेते आहेत, जे स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाहीत, त्यांनाच अशा भोंदूबाबांच्या नादी लागलेली आहे.”
शेवटी उद्धव ठाकरे यांनी असा इशारा दिला, “मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय काढले पाहिजे. सर्वांच्या पापावर पांघरून घातलं जात आहे. या निमित्ताने गावाोगावी भोंदू बाबा असतील, त्या बाजूला कोणत्याही पक्षाचा नेता जात असेल, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. अगदी ओम फट स्वाहावरही याचा परिणाम होईल.”या विधानामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले असून, अशोक खरात प्रकरणावर विविध पक्षांचे नेतृत्व, कायदेविषयक निर्णय आणि सामाजिक प्रतिक्रिया यावर लक्ष ठेवले जात आहे.
Powered By Sangraha 9.0