खरात सारख्या प्रवृत्तीशी कोणताही संबंध ठेवू नये

21 Mar 2026 14:28:51
नाशिक,
Chhagan Bhujbal भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकर्मांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अनेक भाविक महिलांचे लैंगिक छळ, शोषण तसेच दडपशाहीच्या माध्यमातून जमिनी हडपण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. खरातशी संबंध ठेवणाऱ्या नेत्यांची यादीही चर्चेत आली असून, त्याचा प्रभाव नाशिकपासून देशभरात जाणारा दिसून आला.
 

Chhagan Bhujbal 
याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते छगन भुजबळ यांनी प्रकरणावर आपले मत मांडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरात सारख्या प्रवृत्तीशी कोणताही संबंध ठेवू नये. अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. काही चांगले साधू आहेत, ते त्यांच्या कामात लक्ष घालतात, त्यांना वेगळे समजावे.भुजबळांनी राजकीय क्षेत्रातील नेत्यांसाठीही सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, राजकीय क्षेत्रात काम करताना काही बंधने पाळणे आवश्यक आहे. फार मोठ्या मंडळींनी खरातकडे भेटी दिल्या, त्यात रुपाली चकणकर यांचाही समावेश आहे. नेत्यांनी सार्वजनिक जीवनात वर्तनाचे मर्यादा पाळणे आवश्यक आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत, कारवाई होईल.
पाणी वितरणाशी Chhagan Bhujbal  संबंधित प्रश्नावरही छगन भुजबळ यांनी स्पष्टता दिली. त्यांनी सांगितले की, मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानासाठी ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिली होती. धार्मिक क्षेत्रातील चांगल्या लोकांना पाणी देणे योग्य आहे. त्यानंतर त्या माणसाचे वर्तन कसे राहील, हे आधीपासून ठरवता येत नाही. त्यामुळे पाणी देण्याचा निर्णय गरजेनुसार घेण्यात आला.छगन भुजबळ यांचे विधान या प्रकरणासंदर्भात राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी अंधश्रद्धा, गैरवर्तन आणि राजकीय जबाबदारी यावर जोर दिला असून, अशा प्रकारच्या प्रकरणांपासून दूर राहण्याचा आणि कायद्याचे पालन करण्याचा संदेश दिला आहे.
Powered By Sangraha 9.0