विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार

21 Mar 2026 20:55:41
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन

राज्यपाल जिष्णु देव वर्मा
नागपूर, 
Bharatiya yuva sansad pariṣad भारतीय युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे कार्य गत दोन दशकांपासून होत आहे. देशाच्या अमृत काळात आपण सर्वांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. सर्वसमावेशक, अधिक मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात २९ भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह व वरिष्ठ प्रचारक डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

yuva-sansad-1 
 
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, कोणत्याही देशाची क्षमता आणि सामर्थ्य हे त्या देशाच्या तरुण लोकसंख्येच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असते. भारताकडे तरुणांची मोठी संख्या ही अत्यंत जमेची बाजू आहे. आज देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील युवकांची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तरुणांच्या शिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
युवकांनी संधीचे सोने करावे
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, भारतीय युवा संसदेच्या परिषदा देशाच्या कानाकोपर्‍यात आयोजित करण्यात येत असल्याने युवकांना राष्ट्रीयस्तरावरील चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळते. अशाच संधीचा उपयोग करीत युवकांनी संधीचे सोने करावे. युवा संसद परिषदेत भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम झाले आहे. या परिषदेच्या माध्यमातून युवकांच्या विचारांना आकार देण्याचे कार्य होते. चारित्र्य संपन्न युवक घडविण्यात अशी परिषद उपयोगी ठरते.
 
 
युवा पिढी हीच देशाची सर्वात मोठी शक्ती
 
 
Bharatiya yuva sansad pariṣad  देशातील सर्वच भागातील युवा नेते आणि तरुण भारतीय युवा परिषदेला येऊन राष्ट्रनिर्मितीची चर्चा करतात. आजच्या ‘स्क्रीन टाईम’च्या काळात ही महत्वाची चर्चा फलदायी आहे. आजच्या घडीला भारताची युवा पिढी हीच आपल्या देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
विविधतेत एकता हे देशाचे वैशिष्ट्य
ते पुढे म्हणाले, उत्साही व गतिमान युवा पिढी राष्ट्र निर्माणात ठरणार असून २०४७ या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही. यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. भाषा, धर्म, जात, पंथ देशातील विविध भागात वेगवेगळ्या असल्या तरी भारत देश एकसंघ असल्याचे दिसून येतो. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आजवर देशावर आक्रमणे झाली, मात्र आपल्या एकसंघतेच्या बळावर ही आक्रमणे भारताने परतवून लावली. भारतीय युवा संसद परिषदेला सहाव्यांदा उपस्थित राहात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0