बसमधुन दागीने चोरणार्‍या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

21 Mar 2026 18:07:02
स्थागुशा पथकाची कारवाई
वाशीम, 
धावत्या Bus: Gold thief बसमधुन सोन्याचे दागीने चोरणार्‍या संभाजीनगर जिल्ह्यातील चिखलठाणा येथील तीन महिलांच्या टोळीला स्थानिक शाखा पथकाने अटक करुन त्यांच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे दागीने हस्तगत केले. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी निर्मला दिलीप श्रीनाथ रा. रिसोड या महिलेने अनसिंग पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्या १३ मार्च रोजी रिसोड वरुन उमरखेड येथे जात असतांना त्यांची अनसिंग ता. वाशीम जवळ चालत्या बसमध्ये पर्स चोरली गेली. त्यामध्ये सोन्याची पोथ व नगदी रक्कम होती.
 
 
Gold thief
 
त्यावरुन अनसिंग पोस्टे ला चोरीचा गुन्हा दाखल करुन स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला असता बसमध्ये चोरी करणार्‍या महिला असल्याबाबत माहिती समोर आली. त्यावरुन २० मार्च रोजी वाशीम बसस्थानकावर काही महिला संशयास्पदत स्थितीमध्ये उभ्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी पथक तयार करुन बसस्थानक परिसराची तपासणी केली असता काही महिला संशयास्पद उभ्या असलेल्या दिसल्या. त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी १३ मार्च रोजी बस मध्ये एका महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपी महिलामध्ये लक्ष्मी व्यंकटेश गड्डी, कविता अशोक गड्डी, गंगम्मा उलगया गड्डी सर्व रा. चिखलठाणा जि. संभाजी नगर असे आरोपी महिलांची नावे आहेत. सदर आरोपी महिलाकडून आणखी चोरीची गुन्हे उघड होण्याची शयता आहे.
 
 
Bus: Gold thief दुसर्‍या कारवाई पोलिस स्टेशन रिसोड येथे दाखल गुन्ह्याचा तपास करतांना आरोपी संतोष सुदाम पवार रा. रिसोड यास ताब्यात घेऊन त्याचेकडुन गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल हस्तगत केली. सदर आरोपीची कसुन चौकशी सुरु असून, त्याच्याकडून चोरी गेलेल्या मोटार सायकलचे गुन्हे उघड होण्याची शयता आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, स्थागुशा पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर यांच्यासह पथकाने केली.
 
Powered By Sangraha 9.0