शिवसेनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
दारव्हा,
Darva-Karanja Toll Naka दारव्हा-कारंजा मार्गावर भुलाई ते भांडेगाव दरम्यान असलेला टोलनाका त्वरित बंद करावा असे शनिवार, २१ मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहरप्रमुख राजू दुधे, तालुका संघटक विवेक ठाकरे, प्रा. किशोर राठोड, कृष्णा शेलोकर, संदीप राठोड, योगेश गवळी, दीपक नाईक, विवेक जाधव, मंगेश इंगोले, घनश्याम रुजाता राऊत इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
दारव्हा-कारंजा महामार्गावरील भुलाई ते भांडेगावदरम्यान नव्याने टोलनाका सुरू करण्यात आला. या टोलनाक्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड असल्याची कैफियत शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे मांडली. त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करून व संबंधित अधिकार्यांशी चर्चा हा टोलनाका बंद करावा, अशी मागणी केली. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क‘मांक ३६१ सी हा दिग‘स व दारव्हा या तालुक्यांमधून जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास जुलै २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला असून अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही.
Darva-Karanja Toll Naka सद्यस्थितीत महामार्गाचे काम अपूर्ण व अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतानाही राष्ट्रीय प्राधिकरणाने दारव्हा ते कारंजा रस्त्यावरील भुलाई ते भांडेगाव दरम्यान टोलनाका सुरू केला आहे. त्यानंतर या महामार्गावर कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. या दोन टोल नाक्यांमधील अंतर अंदाजे ४० किमी आहे. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांना ४० किमी अंतरामध्येच नाहक टोलचा भुर्दंड पडत आहे. याबाबत नागरिक व्यक्त करीत असून या स्थितीत टोलवसुली सुरू राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेला टोलनाका त्वरित बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.