डॉ. प्रवीण डबली यांना ‘जल योद्धा सन्मान’

21 Mar 2026 12:43:26
नागपूर,
Dr. Praveen Dabli जलसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. प्रवीण नीलकंठराव डबली यांना प्रतिष्ठेचा ‘जल योद्धा सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान 28 मार्च 2026 रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात दिला जाणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री श्री रवि शंकर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याचे आयोजन सरकारीटेल यांच्या पुढाकारातून करण्यात येत असून नीती आयोग, जल शक्ती मंत्रालय, तसेच पेयजल व स्वच्छता विभाग आणि भूमी संसाधन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.
 
pravin
 
 
 
तसेच आयआयटी रुडकी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स, आर्ट ऑफ लिव्हिंग, हर घर जल मिशन आणि भारतीय नदी परिषद या संस्था ज्ञान सहकारी म्हणून सहभागी आहेत. Dr. Praveen Dabliजलसंवर्धन, जलसुरक्षा व पर्यावरण जनजागृती या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रयत्नांमुळे जलस्रोत संवर्धनास मोठी मदत होत असल्याचे आयोजन समितीने सांगितले.‘जल योद्धा सन्मान’ सोहळा विशालाक्षी मंडप येथे दुपारी 2 वाजता होणार असून देशभरातील तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0