पंडित बच्छराज व्यास शाळेत गुढी पाडवा उत्साहात साजरा

21 Mar 2026 13:05:59
नागपूर,
Pandit Bachchraj Vyas School पंडित बच्छराज व्यास इंग्रजी माध्यम शाळेत गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि श्रीरामांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली. यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. यावेळी गुढी पाडव्याचे महत्त्व आणि सण का साजरा केला जातो याबाबत मधुरा कोलारकर यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी श्रीरामांच्या जीवनावरही मार्गदर्शन केले.
 
Pandit Bachchraj Vyas School
 
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सार्थक बरडे यांनी लक्ष्मणाची, सारांश पांडे यांनी श्रीरामांची, तर गुंजन विश्वकर्मा यांनी सीतेची भूमिका साकारली. Pandit Bachchraj Vyas School विद्यार्थ्यांकडून रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्राचे पठणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कोलारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सायली जोशी यांनी मानले.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0