पाडवा पहाट आयोजन समितीचे आयोजन
पुलगाव,
Gudi Padwa : 'Padwa Pahat' event गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाडवा पहाट आयोजन समिती व विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पं. दीनदयाल उपाध्याय चौक येथे पहाटे ५ वाजता सुरेल गीतांची मैफल पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन आयडल फेम गायक राहुल खरे, आम्रपाली पगारे आणि सारेगमप लिटील चॅम्प झी मराठी फेम कल्याणी भांडे यांनी गाण्यांची बरसाद केली.
उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. वंदना कारखेले यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले. रेल्वे पोलिस निरीक्षक राजेश औतकर, आयोजन समितीचे अध्यक्ष बबन बरवड, आर. के. हायस्कूलचे माजी प्राचार्य नूरसिंह जाधव, वर्धा नागरी बँकेचे माजी अध्यक्ष व विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान नाचणगावचे अध्यक्ष केशव दांडेकर, नप अध्यक्ष कविता ब्राह्मणकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गणेशपुरे, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, देवळी नगर उपाध्यक्ष राहुल चोपडा उपस्थित होते.
Gudi Padwa : 'Padwa Pahat' event संस्कार भारतीच्या ध्येय गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गायक राहुल खरे यांनी प्रथम तुला वंदितो या सुंदर गीताने सुरूवात करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. आम्रपाली पगारे हिने एक राधा एक मीरा, चिंब पावसानं झालं रान तर राहुल खरे यांनी ऐसी लागी लगन, बाजेरे मुरलीया बाजे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बजाव ढोल स्वागत में, चला हो पंढरीला जाऊ, सासो की माला मे, अश्या अनेक गीतांची मेजवानी दिली. पुलगावची कन्या कल्याणी भांडे हिने जागा झाला ज्ञानाची पावन गीत सादर केले. रसिकगणांच्या आग्रहास्तव लावणी गीत सुद्धा सादर केले.
यशस्वीतेसाठी शिला कपले, गणेश इंगळे, विनोद सावसकडे, हर्षल काळे, राजेश देशपांडे, विठ्ठल वानखेडे, रवीकिरण भोजने, महादेव कणसे, हेमंत येंडे, संदीप बोरकुटे, सागर तुरक, संतोष बैतुले, प्रतिभा रायपुरे, वर्षा बाभळे, संगीता देशमुख, मंदा तरंगे, आदींनी सहकार्य केले. संचालन दीपाली काळे, तर आभार माजी प्राचार्य गणेश इंगळे यांनी मानले.