बरडशेवाळा मस्के परिवाराचे प्रेरणादायी उदाहरण
हदगाव,
Hadgaon: Maske family आजच्या काळात किरकोळ कारणांवरून कुटुंबे विभक्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि एकल कुटुंबपद्धतीकडे झुकणार्या समाजात संयुक्त कुटुंब व्यवस्था टिकवणे हे मोठे आव्हान मानले जाते. अशा परिस्थितीत हदगाव बरडशेवाळा येथील मस्के परिवाराने एकत्रित कुटुंब पद्धतीचा आदर्श जपून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे.
Hadgaon: Maske family बरडशेवाळा येथील स्वर्गीय विठ्ठलराव सोनबाराव मस्के व त्यांच्या स्वर्गीय पत्नी इंदुबाई मस्के यांच्या संस्कारातून घडलेला हा परिवार आजही एकजुटीने नांदताना दिसतो. चार मुले, तीन मुली, सर्व विवाहित सदस्य, नातवंडे व पणतू यांचा समावेश असलेले ३५ सदस्यांचे हे मोठे कुटुंब आजही एकाच छताखाली आनंदाने राहते. गावात आणि परिसरात ‘टाटा’ या नावाने ओळखल्या जाणार्या या परिवाराने एकात्मतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये परस्पर प्रेम, विश्वास आणि सहकार्याची भावना दृढ आहे. मोठ्यांचा सन्मान आणि लहानांवर योग्य संस्कार हीच या कुटुंबाची खरी ओळख त्यामुळेच इतक्या मोठ्या कुटुंबाचे व्यवस्थापन आजही सुरळीतपणे सुरू आहे.
मस्के कुटुंबाकडे गावालगत राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ४० एकर शेती आहे. शेतीसोबतच त्यांनी तालुक्यातील सर्वात मोठा सात भट्ट्यांचा गूळ कारखाना उभारला आहे. ऊस वाहतूक व शेतीसाठी चार ट्रॅक्टरची सुविधा असून, या उद्योगातून जवळपास ५० कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कुटुंबातील महिला पुरुष सर्वजण शेती आणि व्यवसायात एकमेकांना हातभार लावतात.
कामाचे योग्य नियोजन आणि जबाबदार्यांचे समतोल वाटप यामुळे प्रत्येक सदस्य आनंदाने आपली भूमिका पार पाडतो. सण-उत्सव, धार्मिक कार्यक‘म आणि सामाजिक उपक‘म हे सर्वजण एकत्र येऊन उत्साहात साजरे करतात. तसेच मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामेही एकजुटीने पार पाडली जातात.
Hadgaon: Maske family मागील वर्षांत या कुटुंबातील सदस्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे. काही सदस्यांनी एसटीआय, आरोग्य सेवक तसेच सैनिक सेवेत यश संपादन केले आहे. यामुळे कुटुंबाची प्रगती आणि एकजूट अधिक बळकट झाली आहे. एकजूट, परस्पर सहकार्य आणि संस्कार यांचे जिवंत उदाहरण ठरलेल्या मस्के कुटुंबाने समाजात आदर्श संयुक्त कुटुंब म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या परंपरेतून पुढील पिढ्यांनाही प्रेरणा मिळत असून, गावासह परिसरात या कुटुंबाची विशेष चर्चा होत आहे.