कारंजाचा विकासकामं पाहून विरोधकांच्या पोटात गोळा

21 Mar 2026 19:22:07
स्वीकृत नपं सदस्य दर्यापूरकर यांचा आरोप
कारंजा (घा.), 
Karanja (Gha.): Nagar Panchayat शहरातील नगरपंचायत निवडणूक डोळ्या समोर पाहता विरोधक शहरात होत असलेल्या विकास कामांना जाणीव पूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कारंजातील विकासकामं पाहून विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याचा आरोप नगर पंचायतचे स्वीकृत सदस्य नितीन दर्यापूरकर यांनी केला.
 
 
karanja
 
Karanja (Gha.): Nagar Panchayat  शहरात मागील २५ वर्षांत जी विकास कामे झाली नाही त्या पेक्षा जास्त विकास कामाना आ. सुमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत. शहरात पायाभूत सुविधा भक्कम होताना येथील जनता ‘याचि देही याचि डोळा’ आहेत. पण, शहरातील काही उत्साही विरोधीपक्ष नेत्यांनी हा विकासाचा डोंगर उध्वस्त करण्याचा कट हाती घेत जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील विरोधकांनी उपोषणाचा घाट घातला. शहरात जल जीवन योजना, कचरा डेपो, राजाभोज उद्यान, स्मशानभूमीचा विकास व सर्व पायाभूत सुविधा मिळत आहेत. येथे विकास मोठ्या प्रमाणात होत असून सर्व जनता हा विकास डोळ्यांनी बघत आहे. नगरपंचायत पदाधिकारी सर्व विकास कामांचे आव्हान स्वीकारत सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरिता सक्षम आहे. नाचता येई ना अंगन वाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झाली असल्याचा टोलाही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.
Powered By Sangraha 9.0