नागरा येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धाड

21 Mar 2026 13:12:38
गोंदिया,
gambling शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ मार्च रोजी छापामार कारवाई करून जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला असून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून ५२ तास पत्ते मोबाईल व इतर साहित्य असा ८१ हजार ४५० रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
 

gamling  
 
 
हरीश तांडेकर (३३) रा. झोपडी मोहल्ला, गोंदिया, राजेश लिल्हारे (६७) रा. नागरा, आकाश वाढावे (३२) रा. रामनगर, गोंदिया, छन्नु बीरिया (५३) रा. सावरटोली, गोंदिया, रिंकल राजपाल (३६) रा. सिविल लाईन, गोंदिया, पिरथलाल उर्फ मुन्ना पतेहे रा. नागरा व अल्ताफ राहीन रा. रामनगर, गोंदिया अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैधधंदा रेड तसेच गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना नागरा येथील शेत शिवारात काही इसम ५२ तासपत्तीवर जुगार खेळ खेळवीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पथकाने सदर ठिकाणी छापामार कारवाई केली असता आरोपी हरीश तांडेकर, राजेश लिल्हारे, आकाश वाढावे, छन्नु बीरिया, रिंकल राजपाल हे ५२ तासपत्तीवर जुगार खेळताना मिळून आले. दरम्यान, आरोपींची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम ४२ हजार ५० रुपये, ५ अँड्रॉइड मोबाइल व जुगार खेळण्याचे साहित्य असा ८२ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी जवळील मुद्देमाल जप्त करून चौकशी केली असता सदर जुगार पिरथलाल उर्फ मुन्ना पतेहे व अल्ताफ राहीन हे खेळवित असल्याचे कळले.gambling या आधारे, पोहवा संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून सर्व सातही आरोपींच्या विरोधात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात १६३/२०२६ कलम १२(अ ) महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार संजय चौहान, सुबोध बिसेन, प्रकाश गायधने, दीक्षितकुमार दमाहे , इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, भोजराज बहेकार, संतोष केदार, दुर्गेश पाटील व राम खंदारे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0