मुंबई
Maharashtra weather alert महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील चढउतार शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कधी उष्णतेने तर कधी पावसाने राज्यातील शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक भागांत सतत पाऊस पडत असून, काही ठिकाणी गारपीटही झाल्याचे दिसत आहे. या नैसर्गिक घटनांमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने आजही राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे इशारा दिला आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ३० ते ४० किमी/ताशी वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होईल, असे हवामान विभागाचे अंदाज आहे. नांदेड, लातूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने, वादळी वाऱ्याने आणि गारपिटीमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांत सुमारे ५१,४८८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानामध्ये रब्बी हंगामातील धान्य, कडधान्य तसेच फळबागा प्रमुख आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील Maharashtra weather alert चिखली तालुक्यात शेलूद शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान विशेषतः गंभीर आहे. केळी उत्पादक कौतिकराव इंगळे यांनी आपल्या दोन एकर शेतापैकी एका एकर शेतातील केळीची लागवड केली होती. दुपारी आलेल्या गारपिटीने केळीची पाने फाटली, काळे डाग पडले आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, पुढील काही दिवस राज्यात पावसाचे चढउतार सुरु राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते.या घटनेमुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.