राष्ट्राच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान
नागपूर,
'Mahila din' मध्य रेल्वे कर्मचारी संघाशी संलग्न भारतीय मजदूर संघाच्या महिला शाखेने अजनी डब्ल्यूएसएससी शाळेच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. याप्रसंगी कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या विदर्भ राज्य महिला समन्वयक मीरा कडबे, विदर्भ राज्य महासचिव गजानन गटलेवार, सुहास तिवारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय महिला प्रमुख अनिता पटले यांनी भूषवले. नागपूर प्रशासकीय महिला प्रमुख अपर्णा रेड्डी आणि मीनाक्षी गायकवाड, मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे सरचिटणीस सागर सिंग तोमर, विभागीय महिला प्रमुख अनिता पटले, प्रशासकीय शाखेच्या महिला प्रमुख अपर्णा रेड्डी आणि मीनाक्षी गायकवाड आदींची उपस्थिती होती. रेल्वेच्या सर्व विभागांमधील ४०० हून अधिक महिला रेल्वे कर्मचार्यांनी महिला दिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
'Mahila din' महिला समन्वयक मीरा म्हणाल्या, भारतीय संस्कृती, महिलांचा आदर, त्यांचे हक्क आणि त्यांची कामगिरी यांसारख्या विषयांवर भाषण दिले. तसेच, राष्ट्राच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान अतुलनीय आणि बहुआयामी असून ते आर्थिक, सामाजिक, शिक्षण, विज्ञान आणि संरक्षण यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचा पाया आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा काटुलकर, मोनिका ठाकूर, शीला चौधरी, आरती पाल, चौहान आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होती.