भीषण आग : प्लास्टिक कंपनी जळून खाक

21 Mar 2026 17:45:12
चिपळूण
Chiplun fire incident चिपळूण तालुक्यातील अलोरे-नागावे परिसरातील एका प्लास्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Massive fire, plastic bag manufacturing company, Chiplun fire incident 
उन्हाच्या तडाख्यामुळे आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीची तीव्रता प्रचंड वाढली असून, आगीचे लोळ दूरवरून आकाशात दिसत आहेत. कंपनीतील मोठ्या प्रमाणात साठवलेल्या प्लास्टिकमुळे आग काही क्षणांतच संपूर्ण कंपनीवर झपाट्याने पसरली.सदर आगीमुळे कंपनीला मोठा मालमत्तेचा नुकसान झाले असून, अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेत आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून, नुकसानाची योग्य माहिती अग्निशमन दल व स्थानिक प्रशासनाद्वारे लवकरच समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0