मोरभवन बसस्थानकात अस्वच्छता; प्रवासी त्रस्त

21 Mar 2026 12:19:55
नागपूर,
Morbhavan Bus Stand मोरभवन मध्यवर्ती बसस्थानक येथील नव्या टर्मिनलमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्यामुळे बसप्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ शौचालये व अपुरी स्वच्छता व्यवस्था यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.
 

bus 
 
 
प्रवाशांकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.Morbhavan Bus Stand त्यामुळे नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाने तातडीने या समस्येची दखल घेऊन स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य:प्रवीण देशमुख,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0