नागपूर–शेगाव सायकल वारी यशस्वी

21 Mar 2026 14:40:54
नागपूर,
cycle tour a success द रॉक रायडर्स असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने आयोजित नागपूर ते शेगाव सायकल वारी उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या वारीच्या माध्यमातून समाजात महिला सशक्तीकरण, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. या उपक्रमाला विविध मान्यवरांनी शुभेच्छा देत सायकलस्वारांचा उत्साह वाढविला. वारीदरम्यान सहभागी सायकलस्वारांनी शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने प्रवास पूर्ण केला. या वारीत एकात्मता, फिटनेस आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
 
cycle tour
 
वारीच्या पहिल्या दिवशी सायकलस्वारांनी अमरावती येथील शासकीय वसतिगृहात विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने शेगावकडे प्रस्थान करण्यात आले आणि सायंकाळी सुमारे ७ वाजता सर्व सहभागी शेगाव येथे पोहोचले. तेथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी आध्यात्मिक समाधान अनुभवले आणि विश्रांती घेतली. पुढील दिवशी परतीचा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आला. cycle tour a success ही वारी केवळ प्रवास न राहता सामाजिक संदेश देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला. सहभागींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हीच या वारीची खरी यशोगाथा ठरली.
 
वारीमध्ये सहभागी सायकलस्वार :
साधना पापडकर, संजय धरमठोक, सुनिल दिकोंडवार, योगिता बरडे, संजय घुगल, प्रिती जाधव, अमोल ढोबळे, दिलीप वरकड, दिलीप बिरे, सारंग पांडे, डॉ. सुषमा खंडागळे, जयंत मेंढी, भावना, आशिष पटले, मनोज जाधव, योगेश पापडकर, विष्णू शेंडे, यश गुगल.
सौजन्य: सारंग पांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0