महावीर इंटरनॅशनलची पाणपोई सुरू

21 Mar 2026 19:51:24
यवतमाळ, 
'Panpoi Kendra' उन्हाळ्याच्या तीव‘ झळा दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना देण्यासाठी महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्राच्या वतीने पाणपोई (थंड पिण्याच्या पाण्याची) सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवाभावी उपक‘मांतर्गत शहरातील प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी श्याम टॉकीज परिसरात, तसेच सरदार चौक मार्केट परिसरात अशा दोन 'Panpoi Kendra' पाणपोई केंद्रांची सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून प्रवासी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार या उद्घाटन प्रसंगी केंद्राचे अध्यक्ष प्रवीण निमोदिया यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या सं‘येने उपस्थित होते. सर्वांनी उत्साहाने या सेवा उपक‘मात सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली बांधिलकी दर्शविली.
 
 
 
राजेश भूत, शेखर बंड, शरद निमोदिया, मनोज अग‘वाल, रवी निमोदिया, हर्षल यंबरवार, उमेश पोद्दार, अरुण पनपालिया, कृष्णा निमोदिया, रवी गुड्डू भूत, संदीप गुगलिया इतर सदस्य उपस्थित होते.
प्रत्येक घटक महत्वाचा
मानव सेवा हीच खरी सेवा आहे. या कडक उन्हात 'Panpoi Kendra' पाणपोईसारखे उपक‘म समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित करतात. महावीर इंटरनॅशनल नेहमीच अशा उपक‘मांद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे.
प्रवीण निमोदिया, अध्यक्ष
Powered By Sangraha 9.0