तिसर्‍या माळेला भाविकांच्या गर्दीने फुलला रेणुकागड

21 Mar 2026 20:29:53
श्रीक्षेत्र माहूर, 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर Sri Renukamata Mandir  श्रीरेणुकामाता मंदिरात घटस्थापनेने चैत्र महोत्सवाला प्रारंभ झाला. शनिवार, २१ मार्च रोजी तिसर्‍या माळेला वेदघोषात श्रीरेणुकामातेची महापूजा विधीवत पार पडली. यावेळी छबीना काढण्यात आला. तसेच परिवार देवतांचे पूजन करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. नंतर भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली.
 
 
mata mandie
 
पूजाविधीचे पौरोहित्य भवानीदास भोपी यांनी केले. या प्रसंगी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, दुर्गादास भोपी, जोशी व अरविंद देव यांची उपस्थिती होती. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून भाविक मोठ्या सं‘येने माहूर येथे दाखल होत असून, तिसर्‍या माळेला विशेषतः मोठी गर्दी उसळली होती. भाविकांनी देवीचे दर्शन घेत भक्तीभावाने नवस पूर्ण केले. नवरात्र काळात गायन, वादन, नृत्य अशा विविध कला देवीच्या चरणी अर्पण केल्यास आपली कला वृद्धिंगत अशी श्रद्धा बाळगून राज्याच्या कानाकोपर्‍यातील कलाकार आपली कला सादर करीत आहेत. तिसर्‍या माळेला नागपूरच्या रेणुका काटे यांच्या ‘स्वराली म्युझिक अकॅडमी’ने माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, आई भवानी तुझे लेकरू इत्यादी भक्तीगीते सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली.
 
 
Sri Renukamata Mandir  दरम्यान, चैत्र नवरात्र उत्सवात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून स्थायी कर्मचारी तसेच ३३ रोजंदारीवरील कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक विजय राऊत यांनी दिली. श्री रेणुकागडावरील नवरात्र महोत्सव भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा संगम ठरत असून भाविकांच्या गर्दीमुळे परिसरात धार्मिक वातावरण अधिकच रंगले आहे.
Powered By Sangraha 9.0