अनिल कांबळे
नागपूर, 20 मार्च
director of seasons lawns ‘सीझन्स लाॅन्स’च्या संचालिकेची अंदाजे 2.5 काेटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आराेपाखाली जेलमध्ये असलेल्या तापस नंदूलाल घाेष याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. केवळ खटल्याला हाेणारा विलंब आणि आराेपीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
आराेपी तापस घाेष हा आकाशवाणी चाैक येथील ’सीझन्स लाॅन्स’ मध्ये बुकिंग आणि देखभालीचे काम पाहत हाेता. त्याने आपल्या पत्नीच्या आणि इतर साथीदारांच्या मदतीने लाॅन्सचे बुकिंग चाेरून केले आणि मिळालेली रक्कम स्वत:च्या खात्यात वळवून वृद्ध मालकिणीची 2.5 काेटी रुपयांची फसवणूक केली. पीडित महिला मुक्ता बाेबडे (वय 94 वर्ष) या वयाेमानानुसार आजारी असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या वहिनी किरण देवपुजारी यांनी सीताबर्डी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. याप्रकरणी आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
...म्हणून जामीन मंजूर
न्यायमूर्ती एम.एम.नेरलीकर यांच्या समाेर झालेल्या सुनावणीत महत्त्वाचे मुद्दे समाेर आले. आराेपी 9 डिसेंबर 2020 पासून जेलमध्ये आहे. म्हणजेच त्याला 5 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 2023 पासून या खटल्यात एकाही नवीन साक्षीदाराची तपासणी झालेली नाही.director of seasons lawns सर्वाेच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, खटल्याला हाेणारा विलंब हा आराेपीच्या ’जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या’ (कलम 21) मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.
न्यायालयाने आराेपीला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि एका जामीनदारावर मुक्त करण्याचे आदेश दिलेत. आराेपीने साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा पुराव्यांशी छेडछाड करू नये. तपास अधिकाèयाला आपला पत्ता व माेबाईल नंबर कळवावा. खटल्याच्या प्रत्येक तारखेला हजर राहणे बंधनकारक असून, सलग दाेन तारखांना गैरहजर राहिल्यास जामीन रद्द हाेऊ शकताे.