घोराडच्या देवस्थानमध्ये अन्नछत्र सुरू

21 Mar 2026 17:45:51
सेलू, 
विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या Tīrthakṣhetra Ghoraḍ तीर्थक्षेत्र घोराड येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अन्नछत्र सुरू झाले आहे.विठ्ठल रुख्माई देवस्थानमध्ये गुरुवार १९ रोजी पंढरी धोंगडे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 
 
Vitthal Rukhmai
 
Tīrthakṣhetra Ghoraḍ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष नानाजी खराबे, सचिव डॉ. सुरेश धंदरे, विश्वस्त पळसराम गोमासे, तरुण भारतचे सेलू तालुका प्रतिनिधी विजय माहुरे, बारसु निमजे, श्रीधर झाडे, आदींची उपस्थिती होती. सध्या अन्नछत्र हे बाहेर गावाहून येणार्‍या भाविकांसाठी राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात अन्न छत्र बंद झाले होते. पण, आता नव्याने ह्या कार्याचा शुभारंभ करण्यात आल्याने या अन्नसेवेसाठी अनेक दान दाते पुढे आले आहे.
Powered By Sangraha 9.0