घाटंजीत भरधाव दुचाकीचा कहर..!

21 Mar 2026 20:16:57
अल्पवयीन चालकामुळे महिला गंभीर जखमी
वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षावर संताप

घाटंजी, 
Underage driver शुक‘वार, २० मार्चला घाटंजी शहरातील गिलानी कॉलेजसमोर शुक‘वारी रात्री १०.२० वाजता झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले एका अल्पवयीन मुलाच्या बेफाम वेगामुळे निष्पाप महिलेचा जीव धोक्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून भरधाव वेगात जात असताना साईधाम परिसरातील श्वेता प्रशांत बच्चेवार आपल्या लहान मुलासोबत शतपावलीसाठी बाहेर पडल्या होत्या. याचवेळी भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्या असून दुचाकीस्वार रोहित राठोड (इस्तारीनगर, घाटंजी) हाही गंभीर जखमी झाला आहे.
 
 
driver
 
(संग्रहित छायाचित्र ) 
 
अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत रुग्णसेवक मुज्जू पटेल व त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने जखमींना तत्काळ घाटंजीच्या ग‘ामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला ग‘ामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे शहरात अल्पवयीन मुलांकडून बेकायदेशीरपणे दुचाकी चालवण्याचे प्रकार आणि बेफाम वेगाने वाहन चालवण्याची समस्या पुन्हा ऐरणीवर आली असून, शहरात किरकोळ अपघात रोज घडत असतानाही पोलिस वाहतूक शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
 
 
Underage driver  घाटंजी नगर परिषदेकडून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेपुरतेच राहिले आहेत सुसाट बाईकस्वारांवर लगाम घालण्यासाठी या यंत्रणेचा वापर का होत नाही, तसेच अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन कसे येते, यावर प्रशासनाने कठोर भूमिका कधी घेणार, असे संतप्त सवाल घाटंजीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
Powered By Sangraha 9.0