विश्‍व हिंदू परिषद महिला शक्ती अध्यात्म योगतर्फे भव्य रॅली

21 Mar 2026 18:14:52
आरमोरी, 
अध्यात्म योगा तथा विद्यानगर बर्डी आरमोरी ग्रुप आणि Vishwa Hindu Parishad विश्‍व हिंदू परिषद महिला शक्तीच्या वतीने 19 मार्च रोजी हिंदू नववर्षाचे स्वागत निमित्ताने सुजाताई प्रमोद जोशी यांच्या घरासमोरील प्रांगणात प्रभू श्रीराम आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन-आरती करून भव्य रॅली काढण्यात आली.
 
 
gd
 
Vishwa Hindu Parishad  रॅली दरम्यान येणार्‍या रामभक्त पवनसुत अंजनी पुत हनुमान मंदिरात पूजा करून हनुमान चालीसा पठण आणि आरती करून पुढे रॅलीचा समारोप श्री दत्त मंदिर येथे पूजा-आरती करून करण्यात आला. यावेळी प्रसाद वाटप करण्यात आला. मराठी हिंदू नववर्ष स्वागताच्या या कार्यक्रमात सुजाता जोशी, रंजना गौतम, आभा गहिरवार, नारदेलवार, नंधरधने, संगीता मुरवतकर, सरिता मेश्राम, पद्मा चट्टे, तृप्ती चकिनारपवार, वैशाली गोगुलवार, अलका बावनथळे, अर्चना गोंधळे, पुनम बोरकर, तुरसाबाई बोरकर, नाकाडे, डिंकू गोंधोळे लक्ष्मीताई मने, सना सोरते, श्रद्धा समर्थ, सोनाली वराडे, संगीता मुरवतकर सरिता मुर्वतकर, अ‍ॅड. सायली तितीरमारे, अद्या राणी डोहाळे आदी महिला मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बालगोपालांकरीता नऊ दिवस रोज सायंकाळी रामरक्षा हनुमान चालीसा आणि रामाचे ध्यानाचा उपक्रम मंदिरात पार पडणार आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा आयोजकांनी केले.
Powered By Sangraha 9.0