गव्हाचे काडं जाळताय ? थांबा..!

21 Mar 2026 20:04:41
‘हा’ उपाय न केल्यास जमीन होईल उजाड

पारवा, 
Wheat stalks यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातील व संपूर्ण विदर्भ प्रांतात सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बहुतांश ठिकाणी हार्वेस्टरद्वारे काढणी सुरू आहे. मात्र काढणीनंतर शेतात उरलेल्या गव्हाच्या काडांचे काय करायचे, याबाबत ग‘ामीण शेतकरी संभ‘मात आहेत. काडं जाळून टाकायचे की गाडायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सुमारे ८० टक्के शेतकरी हार्वेस्टरने काढणी करतात. या प्रकि‘येत गव्हाचा फक्त २५ ते ३० टक्के भाग कापला जातो, तर उर्वरित ५० ते ६० टक्के काडं शेतातच राहतात. एका एकरात साधारण एक ते दोन टन काडं उरतात.
 
 
Wheat stalks
 
हे काड लगेच कुजत नसल्याने शेतकरी ते जाळण्याचा पर्याय निवडतात. मात्र कृषी संशोधक डॉ. अनंत इंगळे यांच्या मते, काडं जाळल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्रकिडे नष्ट होतात. वरचा थर कडक होतो आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटते. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका निर्माण होतो. काडं गाडणे का महत्त्वाचे, जमिनीची टिकवण्यासाठी आणि दीर्घकालीन उत्पादन वाढीसाठी काडं जमिनीत गाडणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. काडं जमिनीत मिसळल्याने सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. तथापि, काड गाडण्याची प्रकि‘या योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील पीक घेण्याच्या किमान ५० ते ५५ दिवस आधी काडं जमिनीत गाडले, तरच त्याचे पूर्णपणे खतात होते, असे कृषी विभागाने स्पड्ट केले आहे.

काडं कुजवण्यासाठी काय करावे ?
गव्हाच्या काडांचे जलद विघटन करण्यासाठी पुढील उपाय उपयुक्त ठरतात. काढणीनंतर रोटाव्हेटरने काडं बारीक करून घ्यावे. शेतात पुरेसा ओलावा राखावा किंवा पाणी द्यावे डिकंपोझिंग कल्चर (कुजवणारे जिवाणू) टाकावेत. १० ते १२ दिवसांनी नांगरणी करावी या प्रकि‘येमुळे काडं लवकर आणि जमिनीत सेंद्रिय अन्नद्रव्ये वाढतात.
नत्र व्यवस्थापनही गरजेचे
गव्हाच्या काडांमध्ये कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे कर्ब-नत्र गुणोत्तर जास्त असते. त्यामुळे कुजण्याच्या प्रकि‘येत जिवाणूंना जास्त नत्राची गरज भासते आणि ते जमिनीतील नत्र वापरतात. परिणामी पुढील पिकाला नत्राची कमतरता जाणवू शकते. यासाठी काडं गाडताना अतिरिक्त नत्राचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
कधी जाळणे पर्याय ठरू शकतो ?
Wheat stalks  ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता नाही, जमिनीत ओलावा नाही किंवा पुढील पिकासाठी वेळ कमी आहे, अशा परिस्थितीत काडं जाळून तातडीने नांगरणी करणे काही प्रमाणात व्यवहार्य ठरू शकते. मात्र हा पर्याय केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरण्याचा सल्ला तज्ञ देतात.
जनजागृतीची गरज
काड दुष्परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने शेतकर्‍यांमध्ये याबाबत अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. राम नारायण जिल्लडवार भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत युवा प्रमुख. जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काड गाडण्याचा पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गव्हाच्या काडाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास ते कचरा खताचा उत्तम स्रोत ठरू शकतो. त्यामुळे जाळण्याऐवजी गाडणे हाच शाश्वत आणि फायदेशीर मार्ग आहे.
Powered By Sangraha 9.0