55 वर्षीय पिठगिरणी चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

22 Mar 2026 17:00:55
अनिल कांबळे
नागपूर, 
sexually assaults पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 55 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पारडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षांची मुलगी गुढीपाडव्यानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने मैत्रिणीसोबत खेळायला गेली होती. खेळून घरी परतत असताना १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरोपी सुरा दशरथ रोडे (५२, पारडी) याने तिला गाठले.
 
 
crime
 
sexually assaults आरोपीने या चिमुरडीला आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवले आणि तिला स्वत: चालवत असलेल्या आटाचक्कीमध्ये नेले. तिथे आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पारडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करीत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.
Powered By Sangraha 9.0