जलसंवर्धनासाठी महाराजबागेत जल जनजागृती अभियान

22 Mar 2026 19:45:42
नागपूर,
Jalsanvardhan janajagr̥ti abhiyan जागतिक जल दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी महाराजबाग उद्यान येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे नागरिकांना जलसाक्षरतेचा संदेश देण्यात अभियानात कौस्तभ चटर्जी, सुरभी जैसवाल, मेहुल कोसुरकर आदींनी सहभाग नोंदवून जलसंवर्धनासाठी जनजागृती केली.
 
 
Jalsanvardhan
 
जागतिक जल दिनानिमित्त युवकांनी हातात फलक घेवून महाराजबाग येथे आलेल्या नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. शुद्ध पाण्याचा योग्यरित्या वापर करावा, पाण्याचा वापर जपून करावा, पाणी वाचविणे आजच्या पाणी संकट समयी महत्वपूर्ण आहे हे समजावून सांगत यावेळी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आगामी उन्हाळ्यात नागपुरात नागरिकांनी पाणी जपून वापरावे याकरिता नागरिकांना जागरूक करण्यात आले. शाश्वत पाणी वापर, वैयक्तिक पाणी वापर कमी करणे आणि सामूहिक जलसुरक्षा सुनिश्चित करण्यावर विशेष भर या अभियानात देण्यात आला.
 
 
alsanvardhan janajagr̥ti abhiyan  दैनंदिन जीवनात जलसंवर्धन व शाश्वततेचे महत्त्व पटवून देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश होता. पाण्याचा न्याय्य व समतोल वापर हा प्रत्येकाच्या जबाबदार वापरावर अवलंबून असतो, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याची नासाडी टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे तसेच स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण करणे अशा व उपयुक्त उपायांवर भर देण्यात आला, ज्यामुळे सर्वांसाठी पाण्याची दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0