पुसद,
Arya Vaishya Samaj आर्य वैश्य समाज श्रीरामपूर यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ महिला सुनीता वट्टमवार यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेवक अश्विनी जिलेवार जयश्री डुबेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुलभा संजय रेक्कावार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक‘मातून यशस्वी स्त्री ही सशक्त कुटुंब आणि समाज घडवू शकते, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. जीवनातील संघर्षांना सामोरे जात असताना स्वतःचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावरही विशेष भर आला.
आजच्या बदलत्या काळात स्त्रिया शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून आर्य वैश्य समाजातील महिलादेखील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, Arya Vaishya Samaj हे या कार्यक‘मातून अधोरेखित झाले. कार्यक‘मासाठी श्रीरामपूर येथील सर्व महिला मंडळींनी मनापासून परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्यामुळे महिला दिनाचा हा कार्यक‘म अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी झाला. कार्यक‘मासाठी अध्यक्ष अन्वी बासटवार, कोषाध्यक्ष प्रिया येरावार आणि सचिव संगीता पापिनवार यांच्या पुढाकारातून कार्यक‘म यशस्वीरीत्या झाला. कार्यक‘माचे संचालन प्रिया येरावार यांनी केले. कार्यक‘मात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. ज्यामुळे महिला वर्ग विशेष आनंदित झाला आणि सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. खेळांच्या माध्यमातून महिलांत मैत्री, एकजूट आणि आनंदाचे वातावरण झाले.