बीड,
Massajog Panchayat by-election बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल. मस्साजोगच्या नवीन कारभार्याच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदासाठी सक्रियतेने तयारी सुरू केली आहे. दरम्यान संतोष देशमुख Santosh Deshmukh यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार विरोधात उमेदवार उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
7 ते 13 एप्रिल
अर्जाची छाननी - 15 एप्रिल
अर्ज मागे घेण्याची तारीख - 17 एप्रिल
मतदान - 28 एप्रिल
निकाल - 29 एप्रिल
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कधी आणि कशी झाली?
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे Massajog Panchayat by-election सरपंच संतोष देशमुख यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी कथितरीत्या अपहरण करून छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील एका कंपनीकडून सुरू असलेला खंडणी वसुलीचा प्रयत्न रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांची हत्या आणि इतर दोन संबंधित प्रकरणांत बीड जिल्हा न्यायालयात १,२०० हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.सरपंचाची हत्या, 'अवादा' कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकारचे तीन वेगळे गुन्हे बीडच्या केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.