कायदा व सुव्यवस्था जनतेनी सहकार्य करावे

22 Mar 2026 18:13:32
भांडेवाडी पोलीस स्टेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्धघाटन
 
नागपूर, 
Bhandewadi Police Station inauguration मध्यवर्ती नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, शहराच्या बाहेरील भागांमध्ये वेगाने होणारे शहरीकरण तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भांडेवाडी येथील पोलीस स्टेशन सुरु झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यास जनतेनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
bhandewadi-one
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सुसज्ज अशा भांडेवाडी पोलीस स्टेशनचे उद्धघाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंघल, पोलीस उपायुक्त निकेतन कदम तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
Bhandewadi Police Station inauguration  भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे परिसरातील जलद व प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होणार असून गुन्हे प्रतिबंध, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सुविधा, तांत्रिक साधने तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पोलीसांची कार्यक्षमता वाढून वेळेत देण्यात सुधारणा होणार आहे. नागपूर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून, नव्याने सुरू करण्यात आलेले भांडेवाडी पोलीस ठाणे हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी स्वागत करून पोलीस स्टेशन संदर्भात माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0