महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
नागपूर,
लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणार्या भोंदू अशोक खरात उर्फ ’कॅप्टन’ खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या सहाय्याने आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. यात काहींना केवळ राजकारण करायचे आहे, असे दिसून येते. महिलांचा सन्मान महत्वाचा असल्याने ज्या महिलांसोबत दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, माहिती CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशिमबाग येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात पत्रकारांशी बोलताना दिली.
कुणालाही सोडले जाणार नाही
CM Devendra Fadnavis खरात प्रकरणात लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही पीडित आहेत, त्यांना धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन, त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये प्रमाणात महिला आता प्रतिसादही देत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. यासंदर्भात मी पोलिस महासंचालकांना सांगितले आहे की, त्यांनी याचे मॉनिटरिंग करावे. याच्यामध्ये विशेष तपास पथक तयार करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुक्त आणि विशेष तपास पथक मिळून हे काम पूर्ण करत आहेत. मला असे वाटते या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कुणालाही सोडले जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे.
सर्वांत जास्त तर माझ्याकडे पुरावे
या प्रकरणी कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा. त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग लावू नयेत. विरोधी पक्षाचे कोण गेलेत त्यांचे मी पुरावे देऊ शकतो? सर्वांत जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत.
काहींना केवळ राजकारण करायचे आहे
कोणाचाही कुणासोबतही फोटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून चाळीस किलोमिटर दुरून त्यांना पाणी दिले, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूक तेथे तोंडाला कुलूप का लागते काय ? सिलेक्टिव्ह का बोलत आहेत? काहींना केवळ राजकारण करायचे आहे. आम्हाला राजकारणात रुची नाही. आम्हाला महिलांचा सन्मान महत्वाचा वाटतो. ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तसेच जेथे आर्थिक व्यवहार दिसून येतील, त्यासंदर्भातही केली जाईल, CM Devendra Fadnavis फडणवीस यावेळी म्हणाले.