‘धुरंधर 2’ वादाच्या भोवèयात

22 Mar 2026 20:06:06
मुंबई
'Dhurandhar 2' सध्या तिकीटबारीवर तुफान गाजत असलेला ‘धुरंधर 2’ वादाच्या भोवèयात अडकला आहे. या चित्रपटामुळे मुंबईत अभिनेता रणवीरसिंह याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
dhurandhar 2 
'Dhurandhar 2'  चित्रपटातील एका दृश्यामुळे अभिनेता रणवीरसिंहवर शीख समाजात तीव्र भावना व्यक्त होत आहे. चित्रपटातील या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘शीख इन महाराष्ट्र’ संघटनेचे अध्यक्ष सरदार गुरज्योतसिंग यांनी या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका दृश्यामध्ये शीख धर्म आणि गुरु गोविंदसिंग यांचा अपमान झाला. त्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे चित्रपट निर्माते आणि अभिनेत्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'Dhurandhar 2' तसेच त्यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी निर्मात्यांनी समाधानकारक भूमिका न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेचया वतीने देण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0