चका जामने केला मार्ग सुकर

22 Mar 2026 19:30:33
प्रशासनाने कंत्राटदारावर टाकले निर्बंध
३१ मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन
 
वर्धा,
Contractor: Chaka Jam Andolan गोपुरी चौक ते साटोडा बायपास सिमेंट रस्ता एका बाजूने तयार करून दुसरी बाजू तशीच अर्धवट ठेवली. तसेच सिमेंट रस्त्याला लागलेल्या २ फुट सळाखी उघडल्या असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदार १००-२०० मीटर काम करून पुन्हा काम बंद करतो. दरम्यान, संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि सा. बां. विभागाला निवेदन देऊन चका जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने २० रोजी नागरिकांनी आंदोलन करताच प्रशासन जागे झाले आणि कंत्राटदारावर निर्बंध घालून ३१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ३१ मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
 
 
andolan
 
गोपुरी चौक ते साटोडा बायपास सिमेंट रस्ता वादग्रस्त ठरला आहे. कामाची वर्क ऑर्डर १६ मार्च २०२४ होती. या रस्त्याचे मागील दोन वर्षापासून काम सुरू असून अद्याप ५० टके पूर्ण झाले आहे. एका बाजूचा अर्धा रस्ता बनवून त्याच्या सळाखी २ फूट बाहेर आहे. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील धूळ उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. याबाबत सा.बां. विभाग आणि जिल्हाधिकार्‍यांना अनेकदा निवेदने दिली. परंतु, कामाची गती वाढत नव्हती. नागरिकांचा आक्रोश वाढला आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसोबत १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन दोन दिवसात काम सुरू न झाल्यास चका जाम आंदोलनाची पूर्व सूचना दिली. दोन दिवसात रस्ता कामाला सुरूवात करावी, एकदा कामाला सुरूवात झाल्यावर पूर्ण होईपर्यंत काम सुरू ठेवावे, काम न केल्यास दंड लावणे व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी निवेदनातून केली होती.
 
 
Contractor: Chaka Jam Andolan मात्र, या निवेदनाची दखल न घेतल्याने २० रोजी सकाळी १० वाजतापासून रस्ता बंद करण्यात आला. सेवाग्रामचे ठाणेदार, कनिष्ठ अभियंता भोलानी, नायब तहसीलदार धर्माधिकारी यांनी प्रशासनासोबत संपर्क करून आंदोलकांच्या मागणीवर चर्चा घडवून आणली. रात्री ८ वाजता सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांच्यामार्फत पत्र प्राप्त झाले. मे. इंदरदीप कॅन्स्ट्रशन कंपनी, उल्हासनगर ११ मार्च २०२५ पासून प्रतिदिन ७ हजार रुपये दंड करण्यात येत असून उपअभियंता वर्धा यांनी ३१ मार्च २६ पर्यंत काम सुरू न झाल्यास आपल्याकडून काम काढून घेण्यात येईल. तसेच सदर कंपनीच्या मालकाने २३ मार्च पासून काम सुरू करून काम पूर्ण करण्यात येईल, असेही पत्रात नमूद आहे. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करून मुदतीत काम सुरू न झाल्यास पुन्हा १ एप्रिलपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 
 
आंदोलनात साटोड्याचे माजी सरपंच अजय जानवे, गौरव गावंडे, सदस्य संदीप मारवाडी, प्रवीण नागोसे, नरेश होनाडे, विपीन कठाणे, गणेश ढवळे, दीपक भुते, विनोद सायरे, बाळा माऊस्कर, राहुल ढोक, महेश अनकर, कृणाल बावणे, समीर उमक, संजय प्रजापती, पंकज वालदे, मयूर गावंडे व ग्रामस्थ सहभागी होते.
Powered By Sangraha 9.0