धुरंधर २’चा तुफानी विक्रम; तीन दिवसांत ५०० कोटी

22 Mar 2026 11:25:59
मुंबई
Dhurandhar 2 box office collection दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर २’ हा बहुचर्चित चित्रपट सध्या देश-विदेशात प्रचंड गाजत असून, प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाही चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
 

Dhurandhar 2 box office collection 
अभिनेता रणवीर सिंग यांच्या प्रभावी अभिनयासह दमदार कथानक आणि भव्य मांडणीमुळे ‘धुरंधर २’ने अवघ्या तीन दिवसांतच ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २०,९१७ प्रदर्शनांमधून सुमारे ११३ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील एकूण एकत्रित उत्पन्न ४०४.५४ कोटी रुपयांवर, तर निव्वळ उत्पन्न ३३९.२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.परदेशातही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, तेथे ९६.५० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर ‘धुरंधर २’चे एकूण उत्पन्न ५०१.०४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अवघ्या तीन दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार केल्याने हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक वेगाने यश मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
दरम्यान, ईद सणाच्या Dhurandhar 2 box office collection निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाला. पहिल्या दिवशी ४३ कोटी, दुसऱ्या दिवशी १०२.५५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ८०.७२ कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने सलग तीन दिवस जोरदार कामगिरी केली आहे. प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याने अनेक ठिकाणी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे, ‘धुरंधर २’ने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.चित्रपटाला दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडूनही मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा आणि रवि तेजा यांसह अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.दरम्यान, काही ठिकाणी या चित्रपटाच्या आशयावरून चर्चा रंगताना दिसत आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटात राजकीय छटा असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, या चर्चांचा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.सध्या ‘धुरंधर २’चा वेग पाहता, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी होणाऱ्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0