अनिल कांबळे
नागपूर,
Instagram prakaran इंस्टाग्रामवरुन मैत्री झालेल्या युवकाने शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिला ओळख दाखविण्यास नकार दिला. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पारडी पाेलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तिलक निर्मल रेवार असे आराेपीचे नाव आहे.
Instagram prakaran पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडी भागात राहणारी 21 वर्षीय तरुणी एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तिला इंस्टाग्रावर रिल्स बनविण्याचा छंद आहे. तिच्या इंस्टाग्रावरील प्रत्येक व्हिडिओला आराेपी तिलक रेवार हा लाईक करीत हाेता. यातूनच शिक्षिकेसाेबत त्याची ओळखी झाली. दाेघेही इंस्टाग्रामवर चॅटिंग करीत हाेते. हळूहळू दाेघांची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, परंतु आराेपीचा हेतू वेगळा हाेता. एकेदिवशी आराेपीने तिला भेटण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बाेलावले आणि अश्लील चाळे केले. तिने लगेच त्याला झिडकारत घरी साेडून मागितले. त्यानंतर त्याने तिला एकट्यात गाठून लग्नाचे आमिष दाखवले. ती लग्नास तयार झाली. त्यानंतर त्याने शिक्षिकेला घरी नेऊन तिच्यासाेबत बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. त्यानंतर आराेपीने तिला अनेकदा ओयाे हाॅटेलमध्ये आणि त्याच्या मित्रांच्या घरी नेऊन अनेक वेळा बलात्कार केला. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वारंवार वचन दिले, पण नंतर टाळाटाळ केली. पीडित शिक्षिका लग्नाचा तगादा लावत असल्यामुळे ताे तिला धमक्या देऊ लागला. फसवणूक झाल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले. आराेपी तिच्याशी लग्न करण्यास नकार देत असल्याने तिने पारडी पाेलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी तत्काळ कारवाई केली. आराेपी तिलक निर्मल रेवार याच्याविराेधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.