मुंबई
Jhimma 3 मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या ‘झिम्मा’ मालिकेचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, ‘झिम्मा ३’चा पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर सादर केले असून, सामाजिक माध्यमांवर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या यशानंतर हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांनी ‘झिम्मा ३’ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आता पहिल्या देखाव्याच्या प्रसिद्धीनंतर या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.यापूर्वीचे ‘झिम्मा’ आणि झिम्मा २ हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मैत्री, नातेसंबंध आणि भावनिक क्षणांसह हलक्याफुलक्या विनोदाची जोड या चित्रपटांची खासियत ठरली होती. त्यामुळेच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान Jhimma 3 निर्माण केले आहे. ‘झिम्मा ३’मुळे या कथेला नवे वळण मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.