यंदाही शेतकर्यांचा कपाशीकडे राहणार कल
दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर घसरल्याचा परिणाम
राळेगाव,
वर्षी तालुक्यात Kharif season खरीप हंगामात ४५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र, कृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन मिळत नसल्याने फरदड कापूस घेण्याच्या मानसिकतेत असलेल्या शेतकर्यांचा कापूस आजही बहुतांश ठिकाणी शेतात उभाच असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे कृषी विभागाकडूनच वारंवार कापूस फरदड घेऊ नका, असे आवाहन केले जात आहे. परंतु कापसाचा दोन वेचणींतच झाडा होत असल्याने उत्पादन कमी होत आहे. दोन वेचणींत हाती आलेल्या कापसावर खर्च फिटत नाही. त्यामुळे शेतकरी रबी हंगामात कापसाला पुन्हा खतपाणी देऊन फरडद कापसाचे उत्पादन घेतात. सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे मागील वर्षी केवळ ७ हजार ३६० हेक्टरवर सोयाबीन, तर कापसाचा हजार ४७३ हेक्टरवर पेरा होता. काही वर्षांपासून फरदड घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजही शेतात कापूस दिसून येत आहे.
फरदड कापसाने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
फरदड कापूस घेतल्याने पुढील पिकावर मोठा परिणाम होतो. ज्या जमिनीत फरदड कापूस घेतला त्या शेतजमिनीत पुढील वर्षी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो. पर्यायाने शेतकर्यांचा कीटकनाशकांच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवते.
बीटी कापूस बियाणे उपलब्ध झाले तेव्हा सुरुवातीला या कापसावर किडींचा प्रादुर्भाव कमी होता. त्यामुळे उत्पादनही भरपूर प्रमाणात होत होते. मात्र, मागील आठ-दहा वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कमी-अधिक पडणार्या पावसामुळे कापसाचे उत्पादन घटते. त्यामुळे लागवडीचा खर्चही नाही व किमान खर्च निघावा, या उद्देशाने शेतकरी फरदड कापूस सांभाळतात. शेतीत आजही कापूस उभा असून, त्याला वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने झाडाला फरदड कापूस लटकलेला दिसत आहे.
महागड्या फवारण्या घेऊनही किडींवर नियंत्रण करता येत नाही. शिवाय, पर्यावरणाचा समतोल बिघडतो, असे कापूस शास्त्रज्ञांकडून सांगितले जाते. मात्र, कृषी विभागाकडून यासंदर्भात शेतकर्यांना मिळणे गरजेचे आहे. कारण, मार्च महिना अर्धा उलटला तरीही शेतकर्यांचा कापूस शेतात उभा आहे.
सोयाबीन, कापूसच शेतकर्यांसाठी आर्थिक स्रोत
Kharif season तालुक्यातील बहुतांश भागातील शेती जिरायती असल्याने सोयाबीन आणि कापूस हीच पिके शेतकर्यांसाठी आर्थिक स्रोत मानली जातात. परंतु या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आणि त्यात बाजारात व सोयाबीनच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, घरखर्च, शेतीखर्च, आरोग्य, बँकेचे कर्ज, खाजगी दुकानदारांच्या उधार्या व इतर महत्त्वाची कामे कापूस व सोयाबीन पिकांवर अवलंबून असतात. यंदा कापसाला चांगला दर मिळेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्यापही कापसाला योग्य भाव न मिळाल्याने कापूस उत्पादक अडचणीत आले आहेत. यामुळे फरदड घेणे शेतकर्यांनी पसंत केले आहे.