मुंबई महापालिकेत राजकीय गोंधळ; खैरुन्निसा यांच्या कार्यालयात ओवैसी बंधूंसह पतीचा फोटो

22 Mar 2026 12:26:27
मुंबई, 
mumbai-municipal-corporation मुंबई महापालिकेच्या राजकारणात एका छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एम-पूर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षा खैरुन्निसा अख्तर हुसेन यांच्या कार्यालयातील या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
 
mumbai-municipal-corporation
 
हुसेन यांनी आपल्या कार्यालयात पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासोबतच त्यांच्या पती अकबर हुसेन यांचा फोटोही लावला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत, सरकारी कार्यालयात अशा स्वरूपाचे छायाचित्र लावणे योग्य नसल्याचा सवाल उपस्थित केला. mumbai-municipal-corporation सरकारी जागेचा वापर वैयक्तिक किंवा व्यावसायिक संबंधांचे प्रदर्शन करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करत भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून वाद वाढत असल्याचे लक्षात येताच संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप केला आणि संबंधित छायाचित्र हटवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ते छायाचित्र कार्यालयातून काढून टाकण्यात आले.
याआधी झालेल्या निवडणुकीत एम पूर्व प्रभागातून पक्षाचे अनेक उमेदवार विजयी झाले असून, या वॉर्ड समितीवर पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. मात्र, सत्तेच्या सुरुवातीलाच उद्भवलेल्या या वादामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पक्षातील प्रमुख नेते विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर आपली भूमिका मांडत असून, ते अलीकडील घडामोडींमुळेही चर्चेत आहेत. mumbai-municipal-corporation मात्र, स्थानिक पातळीवरील या प्रकारामुळे पक्षाला सध्या अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
Powered By Sangraha 9.0