चीनकडून भारतीयांना मोठा दिलासा; तिबेटमध्ये प्रथमच खुल्या व्यापाराला परवानगी

22 Mar 2026 12:37:03
तिबेट,  
trade-allowed-in-tibet-for-indians चीनने आपल्या नियंत्रणाखालील तिबेटमधील तकलाकोट भागात भारतीय व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीमावर्ती व्यापाराला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

trade-allowed-in-tibet-for-indians 
 
तकलाकोट येथे भारतीय व्यापाऱ्यांसाठी कायमस्वरूपी दुकाने उभारण्यात आली असून, यामुळे पहिल्यांदाच ते येथे स्थिर स्वरूपात व्यवसाय करू शकणार आहेत. यापूर्वी व्यापारी तात्पुरत्या व्यवस्थांवर अवलंबून होते, मात्र आता पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहेत. trade-allowed-in-tibet-for-indians स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, भारतीय व्यापाऱ्यांना येत्या काही महिन्यांत, विशेषतः जूनपर्यंत, दुकाने वाटप होण्याची शक्यता आहे. हे ठिकाण पिथोरगड जिल्ह्यापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असून, अनेक वर्षांपासून व्यापारासाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
भारत-चीन व्यापार समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पूर्वी भारतीय व्यापारी नेपाळी व्यापाऱ्यांसोबत मिळून तात्पुरत्या दुकानांतून व्यवसाय करत असत. आता मात्र स्वतंत्र आणि कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध झाल्यामुळे त्यांना अधिक सोयी मिळणार आहेत. स्थानिक प्रशासनाने या भागातील सुविधा वाढवण्यासाठी विविध विभागांना सूचना दिल्या आहेत. trade-allowed-in-tibet-for-indians दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी दूरसंचार सेवा सक्षम करण्यावर भर दिला जात असून, तसेच पर्यटन आणि स्वच्छता सुविधांवरही काम सुरू आहे.
लिपुलेख खिंडीजवळ असलेले तकलाकोट हे पारंपरिक व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असून, येथे लोकर, मीठ, तूप यांसारख्या वस्तूंची देवाणघेवाण होते. काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू होणाऱ्या या व्यापारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0