ओबीसी नेते शब्बीरअन्सारी यांचे निधन

22 Mar 2026 15:12:54
जालना
Shabbir Ahmed Ansari death ऑल इंडिया ओबीसी (OBC) ऑर्गनायझेशनचे वरिष्ठ नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जालना येथील त्यांच्या घरात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते आणि मागील सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आणि नेते शोकविभोर झाले आहेत. ओबीसी नेत्यांकडून त्यांच्या योगदानाची आठवण करून देत श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
 

Shabbir Ahmed Ansari death 
शब्बीर अन्सारी यांनी सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत ओबीसींच्या व्यापक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य समर्पित केले. नुकत्याच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. कालच कुटुंबीयांसह त्यांनी रमजान ईद साजरी केली होती, आणि त्यानंतरच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रा आज रात्री इशा नमाजानंतर सायंकाळी ९ वाजता काढण्यात येईल, त्यानंतर जुना जालना येथील कब्रस्तानमध्ये नामाज ए जनाजा अदा करून अंतिम संस्कार (दफनविधी) करण्यात येईल, असे नातेवाईकांनी सांगितले.
मंडल आयोगाच्या चळवळीतील Shabbir Ahmed Ansari death  त्यांच्या योगदानाबाबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, “मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा शिलेदार आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. माननीय शब्बीर अन्सारी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”याचप्रमाणे, छगन भुजबळ यांनीही ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहली. त्यांनी लिहिले की, “अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या निधनाने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे. शब्बीरभाई यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची कायदेशीर आणि सामाजिक मोहीम यशस्वी करून दाखवली. ‘मंडलनामा’ या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी समाजाच्या चळवळीतील खडतर प्रवास मांडला असून, हा ग्रंथ येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
 
 
शब्बीर अन्सारी हे ओबीसी Shabbir Ahmed Ansari death  समाजाच्या न्यायासाठी झुंजणारे नेते होते. त्यांच्या कार्यामुळे मुस्लिम ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मजबूत पायाभूत रचना तयार झाली आणि सामाजिक न्यायासाठी केलेला त्यांचा लढा इतिहासातील स्मरणीय ठरला.
Powered By Sangraha 9.0