हदगाव,
वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक संस्था, हदगाव येथे जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक‘माच्या प्रमुख वक्त्या Sharyu Manathkar शरयू शिरीष मनाठकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच आजच्या युगातील विद्यार्थ्यांवर योग्य कौटुंबिक संस्कार घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक‘मात त्या म्हणाल्या, जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून स्त्रियांच्या संघर्षाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे. आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शिक्षण, विज्ञान, उद्योग, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आपले कौशल्य आणि नेतृत्व सिद्ध करत आहे.
मनाठकर पुढे म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या घडणीत कौटुंबिक संस्कारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांना व विशेषतः मुलींना आत्मविश्वास, स्वावलंबन, शिस्त, परिश्रम आणि समाजाबद्दलची जबाबदारी यांचे संस्कार मिळाले पाहिजेत. कुटुंब, शाळा आणि समाज या तिन्ही घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सकारात्मक घडण घडविणे गरजेचे आहे. योग्य संस्कार आणि शिक्षणाच्या जोरावरच मुली भविष्यात समाजाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
Sharyu Manathkar कार्यक‘माला संस्थेचे प्राचार्य फारुकी वासे, कार्यकारिणी प्रदेश सदस्य शिरीष मनाठकर, आयएमसी सदस्य गोविंद लोखंडे, राजेंद्र गिरी, सुरेश मुळे, विजय नागे, सुनील रोतावन, अतुल अंभोरे, प्रतीक विश्वासराव, राजेश राठोड, स्नेहल रामटेके, संदेश सोनसळे, प्रदीप सूर्यवंशी, योगेश कल्याणकर, प्रकाश डाखोरे, अनिल रोतावन, स्वप्नील फाळके, नंदा काळे, देवानंद कवडे, राहुल जाधव, प्रवीण खरे यांच्यासह मोठ्या सं‘येने विद्यार्थी होते. या कार्यक‘माच्या माध्यमातून क‘ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले तसेच महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडविण्याचा संदेशही देण्यात आला.