शेंबाळपिंपरी,
Shembalpimpri: BJP training पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत शेंबाळपिंपरी मंडळ येथे जिल्ह्यातील पहिला प्रशिक्षण वर्ग यशस्वी झाला. मंडळ अध्यक्ष डॉ. अजित चंदेल यांनी आयोजित केलेल्या या प्रशिक्षण मेळाव्याचे अध्यक्षपद जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी भूषविले ज्येष्ठ भाजपा नेते विनोद जिल्हावार, किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे नेते महेश नाईक, जिल्हा महामंत्री अॅड. आदित्य माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. अमेय नाईक, प्रशिक्षक योगेंद्र राजे, प्रशिक्षक ओमप्रकाश शिंदे, संयोजक कैलाश गावणार, प्रमुख पाहुणे भाजपा नेते मिलिंद उदयपूरकर, माजी महिला अध्यक्ष अरुणा जाधव, अविनाश देशमुख, अनिरुद्ध पाटील यांच्यासह मंडळातील आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Shembalpimpri: BJP training निवासी कार्यशाळेमध्ये उत्तम भोजनाची व्यवस्था केली असून प्रशिक्षणासंबंधी साहित्याचे सर्वांना वाटप करण्यात आले. या ठिकाणी यशस्वी सूत्रसंचालन अश्विनी सुकळकर यांनी केले. कार्यक‘मासाठी शेंबाळपिंपरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेंबाळपिंपरी भारतीय जनता पार्टीच्या मंडळात यशस्वी झालेल्या या कार्यशाळेत भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवणार्या सहकार्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढण्यास मोलाची मदत झाली याचे श्रेय मंडल अध्यक्ष डॉ. अजित चंदेल यांनी प्रदेश संघटनमंत्री डॉ. कोठेकर यांना दिले.