श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा

22 Mar 2026 19:34:34
आर्वी :
Shri Ram Janmotsav श्रीराम जन्मोत्सव निमित्त गुरुवार २६ रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, २४ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी चौक येथे श्रीराम रक्षा व हनुमान चालीसा पठण, बुधवार २५ रोजी सायंकाळी ६ वाजता बाईक रॅलीचे आयोजन एकता गणेश मंडळ, एकतानगर, मुरमुरा फॅटरीपासून करण्यात आले आहे.
 

Shri Ram Janmotsav 
 
Shri Ram Janmotsav  २६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीराम जन्म सोहळा साई मंदिर, साईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजता श्रीराम जन्म शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून शासकीय विश्रामगृह समोरून अनेक ऐतिहासिक व धार्मिक देखावे, भजन मंडळ, यासह शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने गांधी चौक, गुरुनानक धर्मशाला मार्गे कसबा येथे श्रीराम मंदिरात जाणार आहे. भाविक भतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती आर्वीच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0