उच्च पातळी बंधार्‍यामुळे शेती येणार सिंचनाखाली

22 Mar 2026 19:59:26
सायफळला कमी खर्चात अधिक सिंचनाचा प्रयोग

पारवा, 
Sipal irrigation experiment ‘कमी कर्चात अधिक सिंचनाचा प्रयोग’ असे म्हणता येईल अशा विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर सायफळ पैनगंगा नदीवर महाराष्ट्र सरकारकडून उच्च पातळी बंधार्‍याचे काम दोन वर्षांपासून वेगात सुरू आहे. या उच्च पातळी बंधार्‍यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून राहणार असून उन्हाळ्यातसुद्धा पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही.
 

sayfal 
 
यामुळे सायफळ उनकेश्वर परिसरातील शेतीला मुबलक पाणी राहणार असून यामुळे हजारो एकर शेती ओलिताखाली येणार असून याचा फायदा शेतकर्‍यांना मोठ्या होणार आहे. या पाठोपाठ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहात असल्याने पैनगंगेच्या काठावरील अनेक गावात भूजल पातळीत वाढ होईल आणि यामुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे प्रशासन सांगत आहे. सायफळ उनकेश्वर शिवारातून पैनगंगा नदी वाहते. मात्र पैनगंगेपासून अनेक शेतकर्‍यांची शेती लांबदूर असल्याने नदीपात्रातून शेती बागायत करणे अनेक शेतकर्‍यांना शक्य नाही.
 
 
Sipal irrigation experiment  यामुळे या उच्च पातळी बंधार्‍याचे काम झाल्यास परिसरातील जमिनीखालील पाण्याची पातळी वाढणार आहे. यामुळे बोअरवेल विहिरींच्याही पाण्याची पातळी वाढून आपल्याना मोठ्या प्रमाणात सिंचन करता येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामांना खर्‍या अर्थाने गती मिळाली. आमदार हेमंत पाटील आणि किनवटचे आमदार केराम यांनी पाठपुरावा करून रेंगाळलेल्या उनकेश्वर आणि किनवट बॅरेजेसच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. खासदार अशोक चव्हाण यांचेही त्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे. पैनगंगा नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.


हरितक्रांतीची नवी आशा
पैनगंगा नदीवरील बॅरेजेस पूर्ण झाल्यानंतर या भागात शेतीसाठी उपलब्ध होऊन हिरवळ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दीर्घकाळापासून पाण्याच्या समस्येला तोंड देणार्‍या शेतकर्‍यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0