‘द वॉइस ऑफ हिंद रजब' चित्रपटाचा रिलीजवर बंदी

22 Mar 2026 12:02:06
मुंबई
The Voice of Hind Rajab film सिनेमा आणि वास्तवाचे ताणतणाव कधी कधी एवढे संवेदनशील ठरतात की चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चा आणि वाद निर्माण होतात. अशाच एका प्रकरणात, खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट द वॉइस ऑफ हिंद रजब’ भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आला आहे.
 

The Voice of Hind Rajab film, 
ही चित्रपटाची कथा गाझातील एका लहान मुलीच्या दुःखद अनुभवाभोवती फिरते, जी युद्ध आणि हिंसेच्या मध्यभागी अडकते. तिच्या भय आणि मदतीची वाट पाहण्याची गोष्ट अत्यंत भावपूर्ण पद्धतीने दाखवली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. या चित्रपटाला ९८व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मच्या श्रेणीत नॉमिनेशन मिळाले होते. तसेच, वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर दरम्यान प्रेक्षकांनी २३ मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन दिले.
 
 
चित्रपट भारतात मार्चच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता, परंतु सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने रिलीजवर बंदी घालली. बोर्डाला चित्रपटात कोणतेही अश्लील किंवा हिंसक दृश्य सापडले नाही, तसेच राजकीय संवादही नव्हते; तरीही भारत-इजराइल संबंधांच्या संवेदनशीलतेमुळे मंजुरी दिली गेली नाही. डिस्ट्रीब्युटर मनोज नंदवाना यांनी सांगितले की, सामान्यपणे चित्रपटात बदल सुचवले जातात, परंतु या प्रकरणात अशा सूचनाही नाहीत.
 
 
चित्रपटामध्ये दाखवलेले The Voice of Hind Rajab film वास्तव अत्यंत हृदयद्रावक आहे. २९ जानेवारी २०२४ रोजी गाझामध्ये घडलेल्या या घटनेत हिंद रजब नावाची मुलगी एका हल्ल्यात कारमध्ये अडकून राहते. तिने पलिस्तीनच्या इमरजन्सी सर्व्हिसला फोन करून मदत मागितली, परंतु रेस्क्यू अपयशी ठरतो. कारवर शेकडो गोळ्या झडतात आणि मदतीस येणाऱ्या दोन पॅरामेडिक्सही मृत्युमुखी पडतात.सध्या या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शित न होण्याच्या निर्णयामुळे चित्रपटसृष्टी आणि राजकारणाच्या नात्यावर नवे चर्चासत्र सुरू झाले आहे. या घटनेमुळे चित्रपटाची लोकप्रियता आणि चर्चा दोन्ही अधिकच वाढल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0