उमेद महिला कॅडर संघटनेच्या समस्यांसाठी शासनस्तरावर प्रयत्न करू : डॉ. भोयर

22 Mar 2026 17:41:50
वर्धा, 
Umed Mahila Cadre Organization गेल्या अनेक वर्षांपासून उमेद अभियानात तुटपुंज्या मानधनावर महिला कॅडर ग्राम पातळीवर ग्रामसंघामध्ये विविध माहिती संकलनाचे काम करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मानधन वाढविण्यासाठी व त्यांच्या विविध समस्यांसाठी शासनस्तरावर संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. दादाजी धुनीवाले सभागृहात संघर्ष उमेद महिला कॅडर संघटना महाराष्ट्रच्यावतीने विविध मागण्यांसाठी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अतुल शेंद्रे, सचिव विजय दरणे, कल्पना खोबे, पृथ्वीराज शिंदे, आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.
 
 
Umed Mahila
 
Umed Mahila Cadre Organization  महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी बचतगटाची निर्मिती करण्यात आली आहे. या बचत गटांना सक्षम करण्यासाठी उमेद अभियान राबविण्यात येत आहे. उमेद अभियानांतर्गत ग्रामसंघ, प्रभाग संघ, तालुका संघ अशी साखळी तयार करण्यात आली आहे. यासाठी महिला कॅडरचा वापर करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम शासन करीत असून महिला कॅडरला न्याय देण्यासाठी शासनस्तरावर आपल्या समस्या मांडून समस्याचे निराकरण करण्यात येईल. यासाठी महिलांनी निराश होऊ नये. कृषी सखी, बँक सखी, उद्योग सखींनी समन्वय ठेऊन कामे करावे. यश हे एक दिवस प्राप्त होणारच आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी अतुल शेंद्रे यांनी उमेद महिला कॅडर संघटनेच्या महिला १ हजार ५०० रुपये मानधनावर काम करीत असून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशा विविध समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. बैठकीला वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0