उच्च न्यायालयात दाद मागणार
वणी,
Vani: Knife attack case वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाणे हद्दीतील भालर वसाहत येथे घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणात पोलिसांनी योग्य गुन्हा नोंदवला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात स्थानिक विश्रामगृहात शनिवार, २१ मार्च रोजी पत्रपरिषदेत अॅड. सोनिया गजभिये यांनी ही माहिती दिली. अॅड. गजभिये या उच्च न्यायालयात नागपूर येथे वकिली करत ‘भीमराज की बेटी’ या संघटनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, वणी येथील एका पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली होती. याच कारणावरून सुनील मोहितकर याने १७ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या घराजवळ येऊन चाकूहल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
Vani: Knife attack case घटनेची तक्रार शिरपूर पोलिस ठाण्यात दाखल करूनही पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करता भारतीय न्याय संहिता अंतर्गत कमी गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. तसेच आरोपीचा पीसीआर न घेता आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त न करता कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागितली असता, त्यांनीही शिरपूर ठाणेदाराची बाजू घेत अपमानास्पद वागणूक दिल्याचाही आरोप अॅड. गजभिये यांनी पत्रपरिषदेत केला. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात शिरपूर पोलिस ठाणेदारांनी अॅड. सोनिया गजभिये यांनी केलेले आरोप फेटाळून लावले असून त्यांच्या तक‘ारीनुसार आणि वैद्यकीय अहवालानुसारच केल्याचे स्पष्ट केले.