अहल्या-लक्ष्मी शाखांचा वर्षप्रतिपदा उत्सव

22 Mar 2026 18:09:04
नागपूर,
Varsh Pratipada Festival बजाज नगर येथील बास्केटबॉल ग्राऊंडवर अहल्या शाखा व लक्ष्मी शाखेतर्फे वर्षप्रतिपदा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाखा संचालन रंजना तोरासे यांनी केले, तर ध्वजाग्रेसरीका म्हणून नेत्रा लाखे यांनी जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमात प्रार्थना अरुणा क्षिरसागर यांनी सादर केली. लक्ष्मी शाखेच्या कार्यवाहिका सुरेखा हळवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी अदिती देशमुख यांचे स्वागत श्रेया टाकळकर यांनी केले, तर त्यांचा परिचय सुहास खानझोडे यांनी करून दिला. अदिती देशमुख यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.

shakha 
 
 
यावेळी कांचन कोल्हटकर यांनी वैयक्तिक गीत, तर सुवर्णा टाकळकर यांनी सांघिक गीत सादर केले. Varsh Pratipada Festival आभार प्रदर्शन कांचन त्रिपाठी यांनी केले आणि शेवटी वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली
सौजन्य :मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0