निसर्ग पर्यटनाला चालना : स्थानिक युवकांना रोजगार
पांढरकवडा,
World Forest Day जागतिक वनदिनाचे औचित्य साधत पांढरकवडा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने घाटंजी तालुक्यातील जांब (हेटी) येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या पर्यटन सफारी मार्गाचे उद्घाटन आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते करण्यात या उपक‘मामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्घाटन कार्यक‘माला यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी, जांबचे सरपंच रमेश सिडाम, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या सं‘येने उपस्थित
World Forest Day यावेळी जांब (हेटी) येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. पर्यटनासाठी सज्ज असलेल्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून सफारीचा शुभारंभ करण्यात आला. निवड झालेल्या निसर्ग मार्गदर्शक युवकांना टी शर्ट व टोपीचे वाटप करण्यात आले. पांढरकवडा वनविभागाच्या परिसरात टिपेश्वर अभयारण्यालगत विस्तीर्ण जंगल असून येथे वाघ, बिबट्या, रानकुत्रे, अस्वल, लांडगा, कोल्हा, नीलगाय, काळवीट, ससा यांसारखे अनेक वन्यप्राणी आढळतात. विविध पक्षी, फुलपाखरे व दुर्मिळ वनस्पतींमुळे हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. या नैसर्गिक संपत्तीचा पर्यटनदृष्ट्या उपयोग करून स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने सुमारे ३७ किमी लांबीचा सफारी मार्ग विकसित करण्यात आला आहे. हा मार्ग पारवा व घाटंजी वनपरिक्षेत्र तसेच वनविकास महामंडळ क्षेत्रातून सफारी मार्गावर सहा कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. जांब (हेटी) येथे मु‘य प्रवेशद्वार उभारण्यात आले असून हे ठिकाण पांढरकवड्यापासून सुमारे १६ किमी तर यवतमाळपासून ५१ किमी अंतरावर आहे. सध्या २० नोंदणीकृत जिप्सी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून १५ स्थानिक युवकांना मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सफारी शुल्क प्रती वाहन ३००० रुपये, मार्गदर्शक शुल्क ४०० रुपये आणि शासकीय शुल्क १००० रुपये प्रती फेरी असे निश्चित करण्यात आले आहे. आठवड्यातील गुरुवारी सफारी बंद राहणार असून सकाळी ६ ते १० व दुपारी २ ते ६ या वेळेत पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशद्वार तिकीटघर, विश्रांती व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी, सफारी मार्गाचे कौतुक करून पावसाळ्यातही सफारी सुरू राहावी यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, वन्यजीवांसाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय व जांब तलाव येथे जलपर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
World Forest Day या प्रकल्पामुळे जांब व परिसरातील सुमारे ५० युवकांना मार्गदर्शक व व्यवस्थापन क्षेत्रात रोजगार मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती वाढून मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला. नवीन सफारी मार्गामुळे पांढरकवडा परिसरात निसर्ग पर्यटनाची मोठी क्षमता निर्माण झाली असून भविष्यात यवतमाळ जिल्हा राज्याच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.