नाग, पिवळी, पोहरा नदी अन् तलावांच्या स्वच्छतेसह भर

22 Mar 2026 19:50:21
जलस्त्रोतांना प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी महापौरांचा पुढाकार
स्वयंसेवी संस्थांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर,
'World Water Day' ’जागतिक जल दिनाचे औचित्य साधून नागपूर शहराचे नैसर्गिक वैभव असलेल्या जलस्त्रोतांचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी महापौर निता ठाकरे यांनी रविवारी स्वयंसेवी संस्थांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीला सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 

jalparni zz 
 
बैठकीत महापौर निता ठाकरे यांनी नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या मुख्य जलवाहिन्यांसह शहरातील अंबाझरी आणि फुटाळा तलावाच्या सद्यस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली.विशेषतः तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेली जलपर्णी ही एक गंभीर समस्या बनली असून, कायमस्वरूपी सुटका कशी मिळवता येईल, यावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात आले.

जलपर्णीची समस्या कायम
'World Water Day' बैठकीत उपस्थित असलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी जलसंवर्धनासाठी आपापले अनुभव, मते आणि तांत्रिक उपाययोजना मांडल्या. महापौरांनी या सर्व संस्थांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि जलपर्णीची समस्या सोडवण्यासाठी नेमकी कोणती घेणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर चर्चा केली. या सूचनांची अंमलबजावणी करून लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

भूजल पातळी वाढवणे आवश्यक
भूजल पातळी वाढवण्यासाठी ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा मंत्र
केवळ नद्या आणि तलावांची स्वच्छताच नव्हे, तर भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता शहराची भूजल पातळी वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद
Powered By Sangraha 9.0